Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त सिंहनाद ग्रुपने केले अन्नदान

पिंपरी / महाईन्यूज

कोरोनाचे सावट असल्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील सिंहनाद ग्रुपने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी न करता जयंतीचे औचित्य साधून सामाजिक बांधीलकी जपत दिघी येथील मातृछाया बालकाश्रम व कामशेत येथील किनारा वृध्द व मतिमंद सेवा ट्रस्ट येथे गरजुंसाठी अन्नदान केले. सिंहनाद ग्रुपचा हा आदर्श समाजामध्ये इतर सामाजिक संघटनांनी सुध्दा घ्यावा, असे आवाहन ग्रुपमधील युवा कार्यकर्त्यांनी केले आहे.

अन्नदान करतेवेळी अक्षय दरे, अनिकेत साळवी, राहूल सांडभोर, राकेश करकल, खंडू धडके, मोहनीश पाबळे, सूचित कुलट, शसांक महामुनी, राहूल सणस, अजिंक्य जम, शुभम सावंत, किरण घनवट, राजू त्रिभुवन, निलेश गेंगजे, सत्यजित शिंदे, मंगेश परब, सुजित मोहती, विशाल बाणे, विनोद पवार, नितीन सेगाल, अक्षय भामे, प्रशांत पाटील, बाळकृष्ण हजारे, राहूल वाघमारे, अशोक सर, अक्षय शिंदे आदींनी पुढाकार घेतला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button