राजधानी दिल्लीत विकेंड लॉकडाऊनची घोषणा
नवी दिल्ली – झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येला रोखण्यासाठी राजधानी दिल्लीचे विकेंड कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जतनेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विकेंड कर्फ्यू लावत असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. नायब राज्यपालांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी याबाबत घोषणा केली. दरम्यान, कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक गोष्टींना परवानगी असणार आहे. तसेच आधीपासूनच नियोजित लग्नासारख्या महत्त्वाच्या समारंभांना कर्फ्यू पासच्या माध्यमातून परवानगी असेल आणि चित्रपटगृहांना ३० टक्के प्रेक्षक क्षमतेसह सुरु ठेवण्याची परवानगी आहे. त्याचबरोबर पदार्थांची होम डिलिव्हरी व आठवडी बाजारांना परवानगी आहे, मात्र त्यांना कोरोना निर्बंधांचे पालन करावे लागेल. तर कर्फ्यूमध्ये सभागृह, मॉल, जीम आणि स्पा बंद असणार आहेत.





