Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

“…फक्त मोदींची दाढी वाढतेय”, ममता बॅनर्जींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक टोला!

पश्चिम बंगाल | 

पश्चिम बंगाल निवडणुकांमध्ये आता प्रचार शिगेला पोहोचला आहे. अवघ्या २४ तासांत पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपा विरूद्ध ममता दीदी हा चुरशीचा सामना सुरू झाला आहे. भाजपाने सुवेंदु अधिकारी यांना ममता दीदींविरोधात उभं केलं असलं, तरी ममता दीदींनी त्यांचा सामना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशीच असल्याप्रमाणे प्रचार सुरू ठेवला आहे. शुक्रवारी झालेल्या प्रचारसभेमध्ये त्यांनी थेट मोदींवर निशाणा साधताना त्यांच्यावर खोचक टीका केली आहे. “इथे उद्योगविश्वाचा विकास थांबला आहे, फक्त त्यांची (पंतप्रधान नरेंद्र मोदी) दाढी वाढते आहे. कधी ते स्वत:ला स्वामी विवेकानंद म्हणवून घेतात, तर कधी स्टेडियमला स्वत:चं नाव देतात. त्यांच्या डोक्यात काहीतरी बिघाड झाला आहे. त्यांचा स्क्रू ढिला झालाय असं वाटतंय”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. एएनआयनं यासंदर्भात माहिती दिली आहे.

वाचा- पुण्यात एक ते 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याची मागणी; अजित पवारांचा विरोध

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group