breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई
सचिन वाझे यांच्या एनआयए कोठडीत 3 एप्रिलपर्यंत वाढ
मुंबई – मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ कार आणि त्यात असलेल्या जिलेटिनच्या कांड्या या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयएनं सचिन वाझेंची ३ एप्रिलपर्यंत कोठडी मिळवली आहे. २५ मार्च म्हणजेच आज त्यांच्या कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना विशेष एनआयए न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर एनआयएच्या मागणीनुसार त्यांच्या कोठडीत ३ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
वाचा :-जळगाव जिल्ह्यात लॉकडाउनचं संकट?; घरोघरी जाऊन रुग्ण तपासणी होणार
या प्रकरणासोबतच आता मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास देखील एनआयएलाच देण्यासंदर्भात ठाणे सत्र न्यायालयाने गुरुवारी महाराष्ट्र एटीएसला आदेश दिले होते. त्यामुळे मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास देखील एनआयए करत असून या दोन्ही प्रकरणांमध्ये सचिन वाझे यांचा काय सहभाग होता, यावर एनआयएकडून त्यांची चौकशी केली जाणार आहे.