breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
थाटामाटात रंगला ‘झी मराठी अवॉर्ड’ सोहळा
मुंबई – झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा प्रेक्षकांचा लाडका ‘झी मराठी अवॉर्ड’ सोहळा दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील अत्यंत थाटामाटात पार पडला. कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् आणि कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा देखण्या वातावरणात हा कार्यक्रम रंगला.
यंदा माझा होशील ना, येऊ कशी तशी मी नांदायला, देवमाणूस, अग्गबाई सासूबाई, काय घडलं त्या रात्री?, कारभारी लाईभारी, लाडाची मी लेक ग! या मालिकांमध्ये टफ फाइट बघायला मिळणार आहे. आता प्रेक्षकांची सर्वात आवडती मालिका आणि कलाकार कोण? हे सोहळा टीव्हीवर पाहायला मिळेल तेव्हाच कळेल. हा सोहळा रविवार २८ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता झी मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे.