Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ, महिन्याभरात चौथ्यांदा वाढ

नवी दिल्ली – पेट्रोल- डिझेलनंतर आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. . त्यामुळे ग्राहकांना 14.2 किलो वजनाच्या विना अनुदानित सिलेंडरसाठी 819 रुपये मोजावे लागणार आहे. 24 फेब्रुवारीला एलपीजी गॅसच्या दरात 25 रुपयांची वाढ करण्यात आली होती.

फेब्रुवारी महिन्यात चौथ्यांदा गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. या अगोदर 4 फेब्रुवारीला विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत 25 रूपयांनी वाढ झाली होती. त्या नंतर 15 फेब्रुवारी रोजी 50 रुपयांची वाढ झाली होती. आता पुन्हा एकदा सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपायांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत घरगुती सिलेंडर आता 794 रूपयांवरून 819 रुपयांवर पोहचली आहे.

एका महिन्यात चौथ्यांदा वाढ झाल्याने केवळ तीन आठवड्यातच सिलेंडरच्या किंमतीत एकूण 100 रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे हैराण झालेल्या सामान्य जनतेला या सिलेंडरच्या किंमती वाढीमुळे धक्का बसला आहे. याचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे.

राष्ट्रीय तेल कंपन्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, बीपीसीएल, एचपीसीएल या कंपन्यांनी दोनदा प्रत्येकी 50 रुपयांची वाढ केली होती. जानेवारीत या किंमतीत जरी कोणतीही वाढ झाली नसली तरी गेल्या तीन महिन्यांचा विचार केला तर एकूण 200 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य जनतेला सातत्याने महागाईला सामोरं जावं लागतंय. एलपीजीच्या किंमती या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील प्रोपेन आणि ब्युटेन यांच्या किंमतीवर तसेच डॉलर आणि रुपयाच्या एक्सचेन्ज रेटवर अवलंबून असतो.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button