परीक्षेची वेळ आली; पुणे विद्यापीठाच्या तारखा ठरल्या
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा जाहीर झाल्या आहेत. यंदा ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. उप दरम्यान, परीक्षा मोबाईल किंवा लॅपटॉपवर होणार की महाविद्यालय स्तरावर होणार याचा निर्णय उपसमितीचा अहवाल आल्यानंतर पुढील चार ते पाच दिवसांत समजणार आहे.
मार्च महिन्यांत ऑनलाईन परीक्षा घेण्याबाबत विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार द्वितीय वर्ष ते अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 15 मार्चपासून सुरु होणार असून पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या प्रथम सत्राची परीक्षा 15 मार्चपासून ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांची गुणवत्ता, गैरप्रकारांना रोखणे, विद्यार्थ्यांची सोय यावर चर्चा करुन परीक्षेचे नियोजन केले जाणार आहे. तर विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणींशिवाय परीक्षा देता यावी, यासाठी उपापयोजना करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे विदयापीठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.