‘रामाच्या नावाने चंदा हाच भाजपाचा धंदा’, सचिन सावंताची चौकशीची मागणी
मुंबई – रामाच्या नावाने चंदा हाच भाजपाचा धंदा असून राम मंदिरासाठी भाविकांनी दिलेला निधी भाजपा आरएसएसकडून लुबाडला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवतानाच राम मंदिर तिर्थक्षेत्र ट्रस्टलाच आपला निधी पोहचेल याची जनतेने काळजी घ्यावी, असे आवाहन काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केले आहे.
भाजपा व संघ परिवाराने राम मंदिराकरिता याअगोरदरही निधी गोळा केला होता. त्याचे अद्याप काय झाले याची माहिती दिलेली नाही.राम मंदिरासाठी गेली अनेक वर्षे लढणाऱ्या निर्मोही आखाड्याने विश्व हिंदू परिषदेवर अयोध्या मंदिराकरिता जमा केलेले ₹ १४०० कोटी रुपये लुबाडल्याचा आरोप केला होता. pic.twitter.com/wOXnyCGd3G
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 29, 2021
राममंदिरासाठी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांकडून देशभरातून निधी जमा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर सचिन सावंत यांनी भाजप-संघाकडून जनतेला लुबाडले जाण्याची मोठी शक्यता वर्तवली आहे.
सचिन सावंत म्हणाले की, भाजप व संघ परिवाराने राम मंदिराकरिता याअगोरदरही निधी गोळा केला होता.त्याचे अद्याप काय झाले याची माहिती त्यांनी दिलेली नाही. राम मंदिरासाठी गेली अनेक वर्षे लढणाऱ्या निर्मोही आखाड्याने विश्व हिंदू परिषदेवर अयोध्या मंदिराकरिता जमा केलेले 1400 कोटी रुपये लुबाडल्याचा आरोप केला होता. अखिल भारतीय हिंदू महासभेने 2015 साली विश्व हिंदू परिषदे तर्फे 1400 कोटी रुपये आणि अनेक क्विंटल सोने लुबाडले गेल्याचा आरोपही केला होता. त्याचेही उत्तर अजून संघ परिवारातर्फे दिले गेलेले नाही किंवा याची चौकशी करण्याची तयारी भाजपाच्या कोणत्याही सरकारने दाखवलेली नाही.
४ जानेवारी २०२१ रोजी अखिल भारतीय हिंदू महासभेने भाजपातर्फे राम मंदिर निर्मितीकरता निधी गोळा करण्याच्या कार्यक्रमाचा विरोध केलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भाजपाला अयोध्येत राम मंदिर कधीच नको होते आणि भाजपाकरिता हा केवळ राजकीय आणि पैसे कमावण्याचा कार्यक्रम आहे. pic.twitter.com/yEICNCGBaY
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 29, 2021
अखिल भारतीय हिंदू महासभेने भाजपतर्फे राम मंदिर निर्मितीकरता निधी गोळा करण्याच्या कार्यक्रमाचा विरोध केला असल्याचे देखील सचिन सांवत म्हणाले. गेल्या तीन दशकामध्ये भाजपाने जमा केलेल्या पैशाचा अजूनही हिशोब दिलेला नाही, असे हिंदू महासभेचे प्रवक्ते प्रमोद पंडित जोशी यांनी सांगितले. राम मंदिरासाठी भाजपारुपी रावण पैसे गोळा करत आहे. जर हे निधी संकलन जनतेमध्ये जाहीर केले नाही तर कोर्टात जाऊ, असा इशारा दिला त्यांनी दिला होता.
या पार्श्वभमीवर महाराष्ट्रात भाजपा आणि आरएसएस कडून मोठ्या प्रमाणात रोखीने पैसे गोळा केले जात आहे. भाविकांची लुट होण्याची मोठी शक्यता पाहता सदर पैसा राम मंदिराच्या निर्माण करताच निर्मीत झालेल्या ट्रस्टमध्ये जाईल याची जनतेने काळजी घ्यावी.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 29, 2021
महाराष्ट्रात भाजप आणि आरएसएस कडून मोठ्या प्रमाणात रोखीने पैसे गोळा केले जात आहे. भाविकांची लुट होण्याची मोठी शक्यता पाहता सदर पैसा राम मंदिराच्या निर्माण करताच निर्मीत झालेल्या ट्रस्टमध्ये जाईल याची जनतेने काळजी घ्यावी, असे सावंत म्हणाले.





