देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,06,25,428 वर
नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटीच्या पार गेल्याने चिंता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपापली काळजी घेणे आवश्यक आहे. त्यातच देशात मागील 24 तासांत 14,545 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 163 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 1,06,25,428 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 1,53,032 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात 18,002 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 1,02,83,708 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या 1,88,688 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.
वाचा :-राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 20 लाखांच्या पार
India reports 14,545 new #COVID19 cases, 18,002 discharges, and 163 deaths in last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 1,06,25,428
Active cases: 1,88,688
Total discharges: 1,02,83,708
Death toll: 1,53,032Total vaccinated: 10,43,534 pic.twitter.com/kZppgyGnMZ
— ANI (@ANI) January 22, 2021
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने केंद्र सरकारकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. परंतु त्यानंतर अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अनलॉकच्या काळात रुग्णसंख्येने मोठी उसळी घेतली. परंतु आता मात्र दिवसेंदिवस दिवसभरातील रुग्णसंख्या घटताना दिसत आहे. तरी देशातील एकूण रुग्णसंख्या 1 कोटीच्या पार गेल्याने चिंता वाढली आहे. तसेच ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूने भारतातही शिरकाव केल्यामुळे सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.





