TOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेत आता फेब्रुवारीपासून थंम्ब इम्प्रेशन ऐवजी ‘फेस रिडिंग’ हजेरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांना फेब्रुवारी 2021 पासून थंम्ब इम्प्रेशन ऐवजी फेस रिडिंगद्वारे बायोमेट्रीक हजेरी बंधनकारक व सक्तीची केली आहे. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. विभागप्रमुखांनी 30 जानेवारी पर्यंत विभागात काम करत असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचा-यांचे फेस रिडिंग रजिस्ट्रेश पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.

महापालिका अधिकारी, कर्मचा-यांच्या दैनंदिन उपस्थितीकामी बायोमेट्रीक हजेरी 2010 पासून सक्तीचे केले आहे. तसेच हजेरी मस्टरवर स्वाक्षरी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थंम्ब इम्प्रेशन मधून अधिकारी, कर्मचा-यांना सवलत देण्यात आली होती.

विभागप्रमुखांनी 30 जानेवारी पर्यंत विभागात काम करत असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचा-यांचे फेस रिडिंग रजिस्ट्रेश पूर्ण करावे. फेस रिडिंग करताना ते संबंधित विभागाचे आहरण वितरण अधिकारी यांच्या समक्ष व नियंत्रणाखाली माहिती व तंत्रज्ञान विभागाने करावे.

रिडिंगचे काम पूर्ण झाल्यावर विभागप्रमुखांच्या स्वाक्षरीने विभागातील एकाही अधिकारी, कर्मचारी यांचे रजिस्ट्रेशन करणे बाकी नाही. तसेच सर्वांचे फेस रिडिंग रजिस्ट्रेशन विभागाचे आहरण वितरण अधिकारी यांच्या समक्ष आणि नियंत्रणाखाली करण्यात आल्याचा दाखला 30 जानेवारीपर्यंत प्रशासन विभागाकडे सादर करावा, असे आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button