breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमाला आमदारांची ‘दांडी’

पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्रमाला तीनही आमदारांची अनुपस्थिती

भाजपाचे लांडगे, जगताप, तर राष्ट्रवादीचे बनसोडे आहेत कुठे?

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांना स्मार्ट वॉच अन्‌ सायकल वाटप करण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम शुक्रवारी झाला. मात्र, पोलिसांसाठी आयोजित या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवडमधील तीनही आमदार अनुपस्थित होते. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शहरात गुन्हेगारीची ‘सफाई’ करायला सुरूवात केली. ‘व्हाईट कॉलर’  गुन्हेगारीच्या मुसक्या आवळण्याची भूमिका घेतल्याने अनेकांची अस्वस्थता वाढली आहे. परिणामी, राजकीय वर्तुळात कृष्ण प्रकाश यांच्याप्रति काहीसा नाराजीचा सूर आहे.

दरम्यान, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला पिंपरीचे राष्ट्रवादी आमदार आण्णा बनसोडे, चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे हे अनुउपस्थित होते. पिंपरी-पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्रमाला तिन्ही आमदारांनी अनुउपस्थित राहिले होते.

आमदार सुनिल शेळके यांनी प्रोटोकॉल पाळला…

मावळ विधानसभा मतदार संघातील काही भाग पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येतो. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमाला उपस्थितीबाबत पोलीस आयुक्तालयाने प्रोटोकॉलनुसार आमदार सुनिल शेळके यांनाही निमंत्रीत केले होते. शेळके यांनी मात्र कार्यक्रमाला हजेरी लावली. तसेच, पिंपरी-चिंचवडच्या महापौर माई ढोरे यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button