न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची किलबिल
पिंपरी / महाईन्यूज
राज्य शासनाच्या निर्देशानुसार आज सोमवारी (दि. 4) शाळा भरविण्यात आल्याने लॉकडाऊननंतर पहिल्याच दिवशी रहाटणी येथील न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकायला मिळाला.
कोरोनाच्या प्रादुर्भाव ओसरल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने राज्यातील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज शाळा सुरु करण्यासाठी सॅनिटाईजर, मास्क व आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली.
सरकारनियमानुसार सर्व खबरदारी व उपाययोजनांची पुर्तता केली. सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची कोरोना चाचणी (RT-PCR) करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या शरीराचे तापमान मशीनद्वारे तपासण्यात आले. सर्व वर्ग खोल्या, ऑफिस व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. सोशल डिस्टंसिंगचे पालन करून वर्गात २०-२५ विद्यार्थी बसविण्यात आले.
“घरात ७ ते ८ महिन्यांपासून बसून असल्यामुळे मुलांची उत्सुकता वाढली होती. सगळे मित्र, शिक्षक खूप दिवसांनी कधी भेटतील असे झाले होते. ऑनलाईन शिक्षण घेताना ज्या काही अडचणी आल्या होत्या, ते आता शाळेत आल्यानंतर कमी होतील व चांगले दर्जेचे शिक्षण मिळेला. पालकांनी मुलांना शाळेत पाठवताना कोणतीही खंत बाळगू नये. शाळांनाही मुलांची काळजी आहे” असा विश्वास शाळा मुख्याध्यापिका कल्पलता डीक्रूझ यांनी व्यक्त केली.
सर्व मुलांचे गुलाब पुष्प देऊन सकाळी स्वागत करण्यात आले. सर्व मुलांना, शिक्षकांना, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सॅनिटाईजर व मास्क देण्यात आले.





