Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीमुंबई

नवी मुंबई विमानतळास दि बा पाटलांचे नाव द्या; मनसेची मागणी

Share On

नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. आता मनसेने यात उडी घेत रायगडचे प्रकल्पग्रस्त नेते दिवंगत दि बा पाटलांचे नाव द्या अशी मागणी केली आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केल्यानंतर याला मनसेने विरोध केला आहे. उभा राहत असलेले विमानतळ रायगड जिल्ह्यात आहे. या भूमीला प्रकल्पग्रस्त चळवळीचा इतिहास आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी संपुर्ण आयुष्य वेचणाऱ्या दिवंगत दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी मनसेने पत्रकार परिषद घेत केली आहे.

महाराष्ट्रातील एखादया भव्य प्रकल्पाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे. परंतु लाेकभावना लक्षात घेता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते, आगरी काेळी समाजाचे दैवत स्व. दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अशी मागणी मनसे नवी मुंबई प्रमुख गजानन काळे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button