Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“अशा गद्दारांना बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेण्याचाही अधिकार नाही”; शिवसेनेच्या ‘या’ आमदाराचे प्रतिउत्तर

Share On

भाजप आमदार नितेश राणे यांनी चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी ट्वीटरच्या माध्यमातून केली आहे. ‘नारायण राणे हे बाळासाहेबांचे सर्वात कडवट शिवसैनिक होते. चिपी विमानतळ हा खासदार राणे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, असं ट्विट त्यांनी केले होते. याच विषयावरून आमदार वैभव नाईक यांनी नितेश राणे यांच्यावर घणाघात केला.

गद्दार राणेंना बाळासाहेब ठाकरे यांचे नावही घेण्याचा अधिकार नाही, असे सांगताना विमानतळाच्या नामकरणाची चिंता राणेंनी करू नये, त्यासाठी शिवसेना पक्ष सक्षम आहे, असे वैभव नाईक यांनी ठणकावले. नाईक यांच्या या टीकेवर नितेश यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे उद्घाटन येत्या २६ जानेवारी रोजी होणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button