Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

इस्त्रायलमध्येही कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात, पंतप्रधानांनी टोचून घेतली लस

Share On

तेल अवीव – अमेरिका, ब्रिटन, रशिया या देशांत कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असतानाच आता इस्रायलमध्येही लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सर्वांत प्रथम लस टोचून घेतली. या लसीकरण कार्यक्रमाचे थेट प्रसारणही करण्यात आले.

नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी बेंजामिन यांनी सर्वांत प्रथम स्वत:वर लस टोचून घेतली. नेतन्याहू यांच्यासह इस्रायलचे आरोग्य मंत्री युली एडेलस्टीन यांनादेखील कोरोनाची लस टोचण्यात आली. या दोन नेत्यांनी फायजर-बायोएनटेकने विकसित केलेली लस देण्यात आली. पंतप्रधान नेतन्याहू आणि आरोग्य मंत्री युली एडेलस्टीन यांना लस दिल्यानंतर करोना लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे.

इस्रायलच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी इस्रायलच्या फ्रंट लाइन वर्कर्सना १० रुग्णालये आणि लसीकरण केंद्रावर लस देण्यात येणार आहे. त्यानंतर लसीकरण मोहीम सामान्य नागरिकांसाठी राबवण्यात येणार आहे. लसीकरण्याच्या पहिल्या टप्प्यात ६० हून अधिक वयाच्या नागरिकांना प्राथमिकतेच्या आधारावर लस दिली जाणार आहे.

२७ डिसेंबरपासून नागरिकांना लस देणार

इस्रायलच्या इतिहासातील सर्वात मोठी करोना लसीकरण मोहीम २७ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. इस्रायल दररोज ६० हजार नागरिकांना कोरोनाची लस देण्याची तयारी करत आहे. या लसीकरण मोहिमेसाठी फायजरच्या लस इस्रायलमध्ये दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. इस्रायलने फायजरसह ८० लाख डोससाठी करार केला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button