breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

एस्वाटिनी देशाच्या पंतप्रधानांचा कोरोनामुळे मृत्यू

जोहान्सबर्ग – कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडलेल्या दक्षिण आफ्रिकेतील एस्वाटिनी या देशाच्या पंतप्रधानांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एस्वाटिनीचे पंतप्रधान एम्बरोसे डलामिनी यांना महिनाभरापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून डलामिनी यांच्यावर उपचार सुरु होते.


एस्वाटिनी या देशात अजूनही राजेशाही आहे. रॉयटर्सच्या माहितीनुसार, रविवारी दुपारी एम्बरोसे डलामिनी यांचे निधन झाले. एम्बरोसे यांना 1 डिसेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिरही झाली होती. मात्र, रविवारी दुपारी अचानकपणे त्यांचे निधन झाले.

एस्वाटिनी हा दक्षिण आफ्रिकेचा भाग आहे. या देशाची लोकसंख्या 12 लाख इतकी आहे. आतापर्यंत एस्वाटिनीमध्ये 6768 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 127 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

एम्बरोसे डलामिनी यांनी 2018 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यापूर्वी ते एका कंपनीत मुख्य कार्यकारी पदावर (CEO) कार्यरत होते. त्यांनी बँकिंग सेक्टरमध्ये 18 वर्षे काम केले होते. त्यांनी एस्वाटिनी नेडबँकेचे संचालक म्हणूनही काम पाहिले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button