Uncategorized
पुण्यात बर्थडे पार्टीत तिघांनी केली ‘गंदी बात’, महिलेसमोरच नग्न अवस्थेत केला डान्स!
पुणे: पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वाढदिवसाच्या पार्टीत चक्क महिलेसमोर तीन जणांनी अंगावरील कपडे काढून विवस्त्र अवस्थेत डान्स केल्याचं समोर आलेलं आहे. सांळुके विहारमधील ग्राफीकॉन सोसायटीमध्ये हा प्रकार घडलेला आहे. कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलिसांनी तिघांपैकी एकाला अटक केल्याचं समजते आहे. या प्रकरणी पीडित महिलेनं कोंढवा पोलिसांत घाव घेऊन रितसर तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून राज उर्फ कैलास महेश गणात्रा (वय-47) याला अटक केली आहे. आरोपीचे साधीदार अमोर कंडई आणि सिद्धार्थ शेट्टी हे दोघे फरार आहेत.





