Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणे

ओबीसी आरक्षण : समीर भुजबळ, रुपाली चाकणकरांचे पुण्यात आंदोलन; महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर!

Share On

पुणे । विशेष प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी, ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी तसेच राज्य सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकील नियुक्त करावा यासह विविध मागण्यांसाठी  अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे हा मोर्चा काढण्यात आला.

विशेष म्हणजे, या मोर्चाचे नेतृत्त्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीतील घटक असलेल्या राष्ट्रवादीला हा राजकीयदृष्टया घरचा आहेर ठरला आहे.

ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी पुण्यात आज ओबीसी आरक्षण बचाव कृती समिती च्या वतीने माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व पक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढण्यात आला होता. परंतु, पुणे पोलिसांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मोर्चाला परवानगी नसल्याने पोलिसांनी हा मोर्चा पुढे नेण्यास परवानगी नाकारली. त्यामुळे खासदार भुजबळ आणि इतर ओबीसी नेते कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन शनिवार वाड्यासमोर  रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. माजी खासदार समीर भुजबळ आणि इतर ओबीसी नेते आणि कार्यकर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ठिय्या आंदोलन केल्यामुळे शनिवार वाड्या लगतच्या परिसरात रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली पोलिसांनी हस्तक्षेप करून रस्ता मोकळा करण्यास सुरुवात केली होती.

अवश्य वाचा : पुण्यात ओबीसी मोर्चाला परवानगी नाकारली; समीर भुजबळ पोलिसांच्या ताब्यात

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button