Politics : विधान परिषद निवडणूक सहा जागांचा आज होणार फैसला!
मुंबई | प्रतिनिधी
राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ही पहिली मोठी निवडणूक असल्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपने ताकद पणाला लावली होती. विधानपरिषदेच्या निकालाचा महाराष्ट्रातील आगामी राजकारणावर परिणाम दिसून येतील. आज (दि. ३ डिसेंबर) निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
राज्यातील विधानपरिषदेच्या 3 पदवीधर, 2 शिक्षक मतदारसंघासाठी आणि एका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 1 डिसेंबरला मतदान झालं. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघासाठी मतदान झालं आहे. आज या निवडणुकांची मतमोजणी होणार आहे पुणे पदवीधर मतदारसंघात एकूण 4 लाख 26 हजार 257 मतदारांनी नोंदणी केली होती. कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात झाले. त्याखालोखाल पुण्यात मतदान झाले. पुणे पदवीधरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड आणि भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांच्यात प्रमुख लढत झाली.
मराठवाडा पदवीधर निवडणुकीची आज मतमोजणी, कलाग्राम समोरील केंद्रात होत आहे मतमोजणी, 11 जिल्हाधिकाऱ्यांसह 290 कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नियुक्ती, सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार मतमोजणी, 2 लाख 40 हजार 649 मतपत्रिकांची होणार मतमोजणी, मराठवाडा पदवीधरसाठी 35 उमेदवार आहेत.