Good News : कोरोनावरील लस तयार, पुढील आठवड्यात लसीकरणास प्रारंभ
![Vaccination will be started in four hospitals in Mumbai, informed Dr. Sanjay Oak](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/1594917346-8714.jpg)
मुंबई – करोनावरील जगातील पहिली लस पुढच्या आठवड्यात उपलब्ध होणार आहे. ब्रिटन सरकारने फायझर बायोएनटेकच्या लशीला परवानगी दिली असून, पुढच्या आठवड्यापासून ब्रिटनमध्ये नागरिकांना लस दिली जाणार आहे. करोनावरील लशीला परवानगी देणारा ब्रिटन पहिला देश ठरला आहे.
काही दिवसांपूर्वीच फायझरने करोनावर प्रभावी लस तयार करण्यात यश आल्याची घोषणा केली होती. करोना महामारीविरोधातील लढाईत ब्रिटनला एक आशेचा किरण दिसला आहे. फायझर आणि बायोएनटेकच्या लशीचा मार्ग मोकळा झाला आहे. ब्रिटन सरकारनं फायझर व बायोएनटेकच्या लशीला आज परवानगी दिली.
हे पण वाचा : COVISHIELD लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण – सिरम संस्था
फायझरची लस पुढील आठवड्यापासून ब्रिटनमध्ये उपलब्ध होणार आहे. ब्रिटन सरकारनं यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध केलं आहे. सुरक्षितता, गुणवत्ता आणि परिणामकारक या सर्व मानकांमध्ये लस योग्य ठरली असल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
आवश्य वाचा : ‘सिरम’ची कोरोना लस येणार मार्चमध्ये!
अमेरिका आणि युरोपियन युनियनकडून लस निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. युरोप किंवा अमेरिकेत सर्वात आधी लस येण्याचा अंदाज व्यक्त केला जात असताना करोनावरील लशीला मान्यता देणारा ब्रिटन जगातील पहिला देश ठरला आहे. फायझरची लस करोनावर ९५ टक्के प्रभावी असून, जर्मनीतील औषध निर्माण कंपनी बायोएनटेक आणि अमेरिकनस्थित कंपनी फायझरने युरोपियन युनियनकडे लशीच्या नोंदणीसाठी अर्ज केला आहे.
अतिमहत्वाचे : कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार
सरकारचे लक्ष : सिरम संस्थेच्या लसीच्या वितरण आणि अपडेट्सबाबत अदर पूनावाला सोबत संपर्कात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांना माहिती
फायझरच्या लशीचे २०२० मध्ये ५ कोटी डोस तयार केले जाणार आहेत. २०२१ अखेर १.३ अब्ज डोस उपलब्ध केले जातील. एकूण १७० स्वयंसेवकांवर लशीचे प्रयोग करण्यात आले असून वय, वंश, लिंग या सर्व पातळ्यांवर फायझरची लस प्रभावी ठरली आहे. ही लस वयस्कर व्यक्तींसह सर्वामध्ये ९५ टक्के प्रभावी ठरल्याचे सांगण्यात आलं होतं. पासष्ट वर्षांवरील व्यक्तीतही ही लस प्रभावी ठरली आहे. दरम्यान, फायझरची लस साठवण्यात काही अडचणी आहेत. त्यासाठी खूप कमी तापमान लागते.