Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘वायसीएम’मधील रुबी अलकेअर ह्रदयरोग केंद्र रुग्णसेवेत दाखल

ह्रदयविकार रुग्णांच्या सेवेस सज्ज, अॅजिओप्लास्टी, बायबास सर्जरीपर्यंतचे सर्व उपचार उपलब्ध

पिंपरी |महाईन्यूज|

करोना संसर्गाचा धोका कायम असला तरीही पिंपरी चिंचवड शहरात रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे करोना रुग्णांसाठी सर्मपित केलेले वायसीएम रुग्णालयातील रुबी अलकेअर सर्व्हिसेस ह्रदयरोग उपचार केंद्र पुन्हा रुग्णसेवेत दाखल झाले आहे. या केंद्रात महापालिकेने निश्चित केलेल्या सवलतीच्या दरात उपचार करण्यात येत असून ह्रदयविकार रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डाॅ. दिलीप कनोज यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचा पहिला रुग्ण मार्चमध्ये आढळून आला. त्यानंतर शहरात करोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. दररोज शेकडो रुग्ण आढळून येवू लागल्याने एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण वायसीएम रूग्णालयासह रूबी अलकेअर हदयरोग केंद्र कोरोना सर्मपित केले होते. त्यामुळे रुबी अलकेअर केंद्रात कोरोना रूग्णांवर उपचार केले जात होते. तब्बल आठ महिने करोना रुग्णांवर उपचार करण्यात आले.

सध्यस्थितीत शहरातील करोनाबाधित रूग्ण संख्या घटली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी खासगी हाॅस्पीटलमधील कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच महापालिकेचे वायसीएम रुग्णालय देखील 50 टक्के करुन रूबी अलकेअर हदयरोग केंद्र देखील नाॅन कोविड करण्यात आले. त्यामुळे वायसीएम रूग्णालयात बाह्यरुग्ण कक्ष सुरु केल्यानंतर रुबी अलकेअर केंद्रात ह्रदयविकार रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आले.

वायसीएम रुग्णालयात 2009 पासून रुबी अलकेअर संचलित ह्रदयरोग केंद्र कार्यरत आहे. रुबी अलकेअर केंद्रात एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत तब्बल आठ महिने करोना रुग्णावर उपचार करण्यात आले. सध्यस्थिती ह्रदयरोग केंद्राचे कामकाज खंडीत झाले आहे. त्यामुळे 14 नोव्हेंबरपासून ह्रदयरोग केंद्र ह्रदयविकार रुग्णांच्या सेवेत दाखल झाले आहे.

रुबी अलकेअर केंद्रात 2 सीडी इको, स्ट्रेस टेस्ट (टीएमटी) पासून अँजिओग्राफी (सी.ए.जी.) पर्यंतच्या सर्व तपासण्या केल्या जातात. तसेच, पेसमेकरपासून अँजिओप्लास्टी व बायपास सर्जरीपर्यंतचे सर्व उपचार या केंद्रात उपलब्ध आहेत. केंद्रातील सर्व सेवाचे दर पिंपरी चिंचवड महापालिकेने निश्‍चित केलेले आहेत. ते खासगी रूग्णालयातील दरांपेक्षा 40 टक्कयांनी कमी आहेत. तसेच गोरगरीब रुग्णांसाठी पिवळे आणि केशरी रेशनकार्डधारकांना राज्य शासनाच्या महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत उपचारांची योजना लागू आहे. हदयरोग संबंधित उपचारासाठी रूबी अलकेअर केंद्राचा सर्व लाभ रूग्णांनी घ्यावा, असेही डाॅ. कनोज यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button