BIG NEWS : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या कामामध्ये ७५० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार?

शिवसेना शहराध्यक्ष योगेश बाबर यांचा धक्कादायक आरोप
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे चौकशीची मागणी
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लि. (पीसीएससीएल) च्या निविदा क्रमांक ८ मधील (Selection of SYSTEM INTEGRATOR for Supply, Installation, Testing, Comissioning and O& M For ICT led PCSCL Smart City Solutions) तब्बल ५२० कोटी रुपयांच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे. तसेच अन्य कामांमध्ये एकूण सुमारे ७५० कोटी रुपयांचा भ्रष्ट्राचार झाला आहे. या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना शहराध्यक्ष योगेश बाबर यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कामातील भ्रष्ट्राचाराची माहिती देण्यासाठी शहर शिवसेनेच्या वतीने मंगळवारी आकुर्डी येथील जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या कारभारावर टीकास्त्र सोडण्यात आले.
यावेळी माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…





