Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

स्व. बाळासाहेबांचे ‘ते’ स्वप्न पूर्ण करण्याचा आमचा निर्धार : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई | प्रतिनिधी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे. या दिवसानिमित्त त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे .

यावेळी अजित पवार म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या महान नेतृत्वास माझी विनम्र आदरांजली. स्वर्गीय बाळासाहेबांनी त्यांच्या नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्वाच्या बळावर मराठी मनावर नेहमी अधिराज्य केलं. 

महाराष्ट्राची अस्मिता तसंच मराठी माणसाचा सन्मान आणि सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी जीवनभर संघर्ष केला.’राज्याची सर्वांगिण प्रगती आणि बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना हे बाळासाहेबांचे स्वप्न होतं. स्वर्गीय बाळासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करुया, असंही अजित पवार म्हाणालेत.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज 11.30 वाजता शिवाजी पार्कवर बाळासाहेबांना अभिवादन करणार आहेत. ‘महाविकास आघाडी सरकारचा आणि हिंदू धर्माचा काही संबंध शिल्लक राहिलेला नाही. 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button