breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र
अखेर कलर्स वाहिनीचा मुख्यमंत्र्यांकडे माफीनामा
मुंबई – कलर्स वाहिनीवरील सुप्रसिद्ध बिग बॉस कार्यक्रमात ‘मराठीची चीड येते’ असे संतापजनक वक्तव्य करणारा गायक जान कुमार सानू याच्या विरोधात अनेकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याच्यावर सोशल मीडियावरून प्रचंड टीका होत आहे. दरम्यान, या प्रकरणी कलर्स वाहिनीने आपला जाहीर माफीनामा सादर केला आहे. वाहिनीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत माफी मागितली आहे.