राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी अशोक मगर यांची नियुक्ती
पिंपरी / महाईन्यूज
चिखली, कृष्णानगर व घरकुल परिसरातील कार्यकर्ते अशोक मगर यांची पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते त्यांना नुकतेच निवडीचे पत्र देण्यात आले. घरकुल येथील साडेसहा हजार कुटुंबांना लॉकडाऊन काळात घरपोच रेशन तसेच घरकुल येथील सोसायट्यांना शून्य वीज बील यावे यासाठी सोसायट्यांमध्ये पितांबरी कंपनीच्या सहाय्याने सौर उर्जा प्रकल्प उभारण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती.
यामुळे प्रत्येक सोसायटीची वार्षिक नऊ लाख वीजबिलातून सुटका झाली आहे. त्यांच्या विशेष उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सरचिटणीसपदी काम करण्याची संधी दिली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे यांनी त्यांच्या निवडीबद्दल समाधान व्यक्त केले.