breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
दोन तासांनंतर मुंबई हळूहळू पूर्वपदावर; तिन्ही मार्गावरील लोकल सेवाही सुरू
मुंबई – गेल्या दोन तासांपासून ठप्प असलेली मुंबई आता हळूहळू पूर्वपदार येतेय. महापारेषणच्या ४०० किलो कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट १ची देखभाल-दुरुस्ती सुरू असताना झालेल्या तांत्रिक बिघाडामुळं मुंबईत वीज बंद झाली होती. अखेर दोन तासांनंतर दक्षिण मुंबई व उपनगरांत तसंच, ठाणे, कल्याण भागांत वीज पुरवठा पुन्हा सुरळीत झाला आहे.
वीज पुरवठा खंडित झाल्यानं ठप्प झालेली लोकलसेवादेखील आता पूर्वपदावर येतेय. हार्बर रेल्वेबरोबरच मध्य रेल्वेवर व पश्चिम रेल्वेही सुरू पुन्हा सुरळीत झाली आहे. त्याचबरोबर रस्त्यावरचे सीसीटीव्ही व सिग्नल यंत्रणाही पुन्हा सुरू झाली आहे. तब्बल दोन तासांच्या खोळंब्यानंतर मुंबईत काही प्रमाणात पुन्हा वर्दळ सुरू झाली आहे. काही शासकीय कार्यालयातही वीज पुरवठा सुरळीत सुरू झाला आहे.