breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: भारताने ओलांडला कोरोना रुग्णांचा 71 लाखांचा टप्पा
मुंबई: भारताने कोरोना रुग्णसंख्येचा 71 लाखांचा आकडा पार केलेला आहे. गेल्या 24 तासात देशात नव्या 66,732 कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे. तर 816 जांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 71,20,539 इतकी झालेली आहे. यात प्रत्यक्ष उपचार सुरु असलेल्या 8,61,853 जणांसह डिस्चार्ज मिळालेल्या 61,49,536 आणि मृत्यू झालेल्या 1,09,150 जणांचाही समावेश आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेली आहे.