breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
जम्मू आणि काश्मीर : शोपियान भागात जवानांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
श्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील शोपियान परिसरात सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी सुरु आहेत. आज सकाळी शोपियानच्या सुगन भागातही चकमक झाली. यावेळी जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.
सुरक्षाबल आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने एका विशेष सुचनेच्या आधारे सगून भागात सकाळी शोधमोहीम राबवली. त्यामध्ये त्यांना दहशतवादी लपलेल्या जागेची माहिती मिळाली. त्यानंतर जवानांनी दहशतवाद्यांचा अड्डा घेरला. बाहेर पोलीस आणि जवानांना पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. जवानांनीदेखील त्यास प्रत्युत्तर दिले.
जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. पोलिसांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, शोपियानमधील सुगन भागात अजूनही चकमक सुरु आहे. पोलीस आणि जवान तिथे दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देत आहेत.