Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा पुणे कोर्टानं फेटाळला जामीन

पुणे |महाईन्यूज|

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणांत पुण्यातील एका कोर्टानं विक्रम गोखले यांची जामीन अर्ज फेटाळला आहे.

पुण्यात मुळशी तालुक्यातील डोंगरगाव मधील जमिनीची स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदा विक्री केल्याप्रकरणी विक्रम गोखलेंसह 14 जणांची फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. यात विक्रम गोखले यांच्यासह रामभाऊ म्हाळगी यांचे चिरंजीव जयंत म्हाळगी आणि त्यांच्या पत्नीचा समावेश आहे.

काय आहे प्रकरण?

विक्रम गोखले यांच्यासह रामभाऊ म्हाळगी यांचे चिरंजीव जयंत म्हाळगी या तिघांनी 96 लाख 99 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप जयंत प्रभाकर बहिरट यांनी केला आहे. त्यानुसार अभिनेते विक्रम चंद्रकांत गोखले, जयंत रामभाऊ म्हाळगी, सुजाता जयंत म्हाळगी यांच्यावर पुण्यातील पौड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्लॉटधारकांची एकूण 96 लाख 99 हजार रुपयांची फसवणूक झाली असल्याचा दावा केला आहे. या सर्वांवर 420, 465, 468, 341, 447, 427, 34 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयंत म्हाळगी आणि सुजाता म्हाळगी यांनी 25 वर्षांपूर्वी सुजाता फार्म प्रा. लिमिटेड स्थापन करुन ‘गिरीवन प्रोजेक्ट’ कंपनीची स्थापना केली. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे ‘गिरीवन प्रोजेक्ट’चे अध्यक्ष आहेत. हा प्रोजेक्ट सरकारमान्य असल्याचा दावा करुन त्यांनी खोटी प्रलोभने देऊन प्लॉटधारकांना आकर्षित केल्याचा आरोप आहे. विना हरकत मोजण्या करुन घेण्याचा आदेश असताना संचालक वेळोवेळी हरकत घेत होते. प्लॉटधारकांनी मोजणी करुन घेतल्यावर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तसेच, गिरीवन प्रोजेक्ट हा प्रायव्हेट हिल स्टेशन असल्याचं सांगून फसवल्याचा दावाही फिर्यादीनी केला आहे.

विक्रम गोखले यांच्यासह 14 जणांना जाणूनबुजून चुकीच्या गटात खरेदीखत देणे, खरेदीखतात दिलेल्या गटापेक्षा जवळ जवळ दीड किमी लांब पझेशन देणे, खरेदी खतात दिलेला गट आणि पझेशन दिलेला गट सारखा नसणे, काहींना आजपर्यंत पझेशन घेऊ न देणे, पैसे घेऊन खरेदीखताप्रमाणे क्षेत्र न देणे, खरेदी केलेल्या प्लॉटवर जाऊ न देणे, अशा विविध प्रकारे या प्लॉटधारकांची फसवणूक केली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button