मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भाजप सेवा सप्ताह अभियानांतर्गत 32 प्रभागामध्ये वृक्षारोपण
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने या ‘सेवा सप्ताह अभियानाअंतर्गत ‘वृक्षारोपण व पर्यावरण रक्षणाचा संकल्प’ असा कार्यक्रम करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड शहराच्या इतिहासात नोंद व्हावी, असा कार्यक्रम भाजपच्या लोकप्रतिनिधी, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या 32 प्रभागांमध्ये एकाच दिवशी सोमवारी (दि. 14) दुपारी 12 वाजता ‘वृक्षारोपण व पर्यावरण रक्षणाचा संकल्प’ करीत घडवून आणला.
भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप, माजी खासदार अमर साबळे, महापौर उषा उर्फ माई ढोरे, महिला प्रदेश अध्यक्षा उमा खापरे, शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात, प्रदेश सचिव अमित गोरखे, उप-महापौर तुषार हिंगे, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, दक्षिण भारतीय आघाडीचे प्रदेश संयोजक राजेश पिल्ले, शहर सरचिटणीस व नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे, बाबू नायर, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, माजी उप-महापौर सचिन चिंचवडे, शैलजा मोरे, माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी स्थायी अध्यक्ष विलास मडिगेरी, ममता गायकवाड, प्रमोद निसळ, माऊली थोरात, बाळासाहेब गव्हाणे, शैला मोळक, राजेंद्र लांडगे, प्रकाश जवळकर, भारती विनोदे, सुर्यकांत गोफणे आदी सर्व प्रमुख आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटनेने प्रत्येकी नेमून दिलेल्या प्रभागात जाऊन या सेवा सप्ताह अभियानात सहभाग घेतला. त्याठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. अभियान यशस्वी करण्यासाठी अभियानाचे जिल्हा संयोजक राजाभाऊ दुर्गे, सह-संयोजक विजय फुगे तसेच सर्व प्रभाग समन्वयक यांनी परिश्रम घेतले.