Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

आज माझं घर तुटलं, उद्या तुमचा गर्व तुटेल : कंगना रनौत

मुंबई – अभिनेत्री कंगना मुंबईत दाखल झाली आहे. विमानतळावरुन ती थेट तिच्या घरी पोहोचली आहे. Y प्लस सुरक्षेत कंगना विमानतळावरुन आपल्या खार येथील घरी आली आहे. मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली आहे. यावर आता कंगना आक्रमक झाली आहे. कंगनाने थेट आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना आव्हान दिलं आहे.

अभिनेत्री कंगनाने एक व्हिडिओ ट्विट करत म्हटलं की, ‘आज माझं घरं तुटलंय, उद्या तुमचा अंहकार तुटेल.’

https://twitter.com/KanganaTeam/status/1303636961131782147?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1303636961131782147%7Ctwgr%5Eshare_3&ref_url=https%3A%2F%2Fzeenews.india.com%2Fmarathi%2Fmumbai%2Factress-kangana-ranaut-challenge-to-cm-uddhav-thackeray%2F534217

कंगना विरुद्ध शिवसेना हा वाद आता शिगेला पोहोचला आहे. येणाऱ्या काळात आता याला वेगळं वळण लागलं आहे. विरोधकांनी देखील शिवसेनेवर टीका केली आहे.

कंगना विरुद्ध शिवसेना शाब्दिक युद्ध सुरु असताना मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली. कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम दाखवत पालिकेने त्यावर हातोडा चालवला. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे नेते कंगनाच्या विरुद्ध आक्रमक होत असताना आता मात्र कंगनावर न बोलण्याचे आदेश मातोश्रीने नेत्यांना दिले आहेत.

कंगनाच्या विषयावर बोलू नका असं मातोश्रीवरुन पक्षनेते आणि नवनियुक्त प्रवक्त्यांना सक्त आदेश आले आहेत. त्यामुळे आता संजय राऊतांनी देखील यावर मौन धरलं आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button