Breaking-newsराष्ट्रिय
पेट्रोल आज पुन्हा महागले
नवी दिल्ली – काल एका दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. मध्यंतरी स्थिर असलेल्या पेट्रोलच्या दरात आज नवी दिल्लीत १० पैसे आणि मुंबईत ९ पैसे लिटर एवढी वाढ झाली आहे. १६ ऑगस्टपासून पेट्रोलचे दर वाढत असल्यामुळे आतापर्यंत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर १ रुपये ४० पैसे एवढी वाढ झाली आहे.
नवी दिल्लीत आज पेट्रोलचा दर १० पैशांनी वाढल्यामुळे तेथे पेट्रोल ८१ रुपये ८३ पैसे लिटर झाले असून डिझेल मात्र ७३ रुपये ५६ पैसे लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोलचा दर ९ पैशांनी वाढल्यामुळे पेट्रोल ८८ रुपये ४८ पैसे झाले असून डिझेल ८० रुपये ११ पैसे आहे. तसेच कोलकाता आणि चेन्नईतही पेट्रोलचा दर ९ पैसे लिटर एवढा वाढला असून बंगळुरूत पेट्रोल १० पैशांनी महागले आहे.





