Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबईराष्ट्रिय

Sushant Singh Suicide Case: सीबीआय पथक मुंबईत दाखल, बीएमसीकडून अधिकाऱ्यांना क्वारंटाईनमधून सूट

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचं चार अधिकाऱ्यांचं पथक मुंबईत आज (20 ऑगस्ट) संध्याकाळी दाखल झालेलं आहे. या पथकात दोन पुरुष तर दोन महिला अधिकाऱ्यांचा समावेश देखील आहे. हे पथक पुढचे दहा दिवस मुंबईत तपास करणार आहेत.

सीबीआय पथक तपासासाठी सर्वात आधी सुशांतच्या घरी जाण्याची शक्यता आहे. तिथून सुशांतच्या डायऱ्या ताब्यात घेतल्या जातील. तसेच मुंबई पोलिसांनी केलेल्या सर्व तपासाची माहिती सीबीआयचं पथक घेणार आहे. सीबीआय पथकाची पुढची रणनीती सध्या समोर आलेली नाही. मात्र, या प्रकरणातील आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीचीदेखील हे पथक चौकशी करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button