न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा
पिंपरी – रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
ध्वजारोहन विष्णू तांबे (भिकोबा तांबे स्कूलचे संस्थापक) यांच्या हस्ते झाले. यावेळी संतोष चिकणे, पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव, सुखदेव कांबळे संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, संस्थेचे सेक्रटरी संदीप चाबुकस्वार व मुख्याध्यापिका कल्पना डिक्रुझ उपस्थित होते. यावेळी नेहा कोटेचा व रेणू राठी यांनी संस्थेचे संस्थापक व मुख्याध्यापिका यांच्या मार्गदशना खाली ऑनलाईन टेकनॉलॉजिचा वापर करून इ. ४ व इ ५ वीच्या विद्यार्थ्यांसोबत स्वातंत्र्य दिवस साजरा केला.
यावेळी विद्यार्थांनी विविध स्वातंत्र्य सेनानी यांची वेशभूषा परिधान करून व देशभक्ती गीत गाऊन घरातूनच लाईव्ह स्वातंत्र्य दिवस साजरा केला. तसेच सचिन कळसाईत, वैशाली शिंदे, रिटा राजभोर व सिल्व्हेनिया जाधव यांनी भाषण केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, कार्यक्रमात उपस्थित होते. सूत्रसंचालन उत्कर्षा पाटील यांनी
केले. पाहुण्यांचे आभार प्रज्योत कौर यांनी मानले.