‘प्लाझ्मा’ दान करणा-याला युवक कॉंग्रेसकडून मिळणार ‘जीवनदाता प्रोत्साहन निधी’
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
कोरोना आजारावर उपचार करण्यासाठी अंत्यत प्रभावी ठरत असलेल्या प्लाझ्मा उपचार पध्दतीद्वारे आपल्या रक्तातील प्लाझ्मा दान करण्या-या जीवनदात्यांसाठी पिंपरी-चिचंवड शहर जिल्हा युवक काँग्रेसकडून प्रत्येकी १ हजार रुपये जीवनदाता प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे.
हे अभियान ९ आगस्ट पासून म्हणजेच भारतीय युवक काँग्रेस स्थापना दिन व क्रांती दिन यांचे औचित्य साधत हा जीवनदाता प्रोत्साहन उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. याबाबात अधिक माहिती देताना युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी सांगितले, “अभूतपूर्व अशा या भयानक व जीवघेण्या आजाराने आज वर जगभरात लाखो बळी घेतले आहेत. दिवसेंदिवस हा आजार हाहाःकार माजवत आहे. यावर उपाय म्हणून गेल्या ८ महिन्यांपासून अजून तरी निश्चित औषध उपलब्ध झाले नाही. मात्र, सध्या प्लाझ्मा थेरपी ने मोठ्या प्रमाणात उपचारांना यश मिळत आहे. जीवित हाणी टाळण्यास ती अंत्यत प्रभावी ठरत आहे.
यासाठी कोरोनामधून ब-या झालेल्या रूग्णांनाच आपला प्लाझ्मा दान करून ईतर रूग्णांचे प्राण वाचविता येत आहेत. अधिकाधिक रूग्णांचे प्राण वाचले जावेत. यासाठी ब-या झालेल्या रूग्णांना प्रोत्साहन मिळावे. यासाठी आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने प्रत्येक जीवनदात्यास 1 हजार रुपये प्रोत्साहन निधी देणार आहोत. उपाचारानंतर बरे झालेल्या नागरिकांनी ईतर नागरिकांसाठी पुढे यावे. प्लाझ्मा दान करावा व प्रोत्साहन निधीसाठी मोबाईल क्रमांकावर (९८६०१७७१७७, ८४८४०८३७३७) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे
याबाबत युवक काँग्रेसने पिंपरी-चिचंवड महानगरपालिकेच्या स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. राजेंद्र वाबळे यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. या उपक्रमाची माहिती कळविण्यात आली आहे, अशी माहिती शहराध्यक्ष बनसोडे यांनी दिली.