Breaking-news

पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे अध्यक्ष प्रो. जोगेंद्र कवाडे यांना मंत्रिमंडळ स्थान किंवा महामंडळ वर वर्णी लागण्याची शक्यता?

महाआघाडीचा एक घटक पक्ष असलेला पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे अध्यक्ष प्रो. जोगेंद्र कवाडे गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठेने, विपरीत राजकीय परिस्थितीतही काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत इमाने इतबारे आहेत. फडणवीस सरकारच्या काळात त्यांना भाजपाने महामंडळावर घेण्याची ऑफर दिली होती असे बोलल्या जाते पण त्यांनी हे नाकारल्याचे कळते. ते दलित समाजातील आक्रमक, संघर्षशील वरिष्ठ नेते आहेत. त्यांना सर्वसामान्य शेतकरी, महिला, दलित, आदिवासी, कष्ठकरी, कामगार, विद्यार्थी, इत्यादी घटकांमध्ये विशेष ख्याती आहे या घटकाची त्यांच्या प्रश्नांची प्रो कवाडे यांना व्यवस्थित जाण आहे. म्हणूनच त्यांना सर – सेनापती या उपाधीने संबोधल्या जाते. ते खासदार सुद्धा राहिले आहेत.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा होती पण काही तांत्रिक कारणामुळे मिळू शकले नाही. त्यांचा आमदारकीचा कार्यकाळ सुद्धा आता संपत आला आहे त्यामुळे त्यांची विधानपरिषदेवर पुनःश्च फेरनिवड करून राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्री पद किंवा जबाबदार महामंडाळाचे अध्यक्ष पद देण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे महामंडळ अध्यक्ष पद हे राज्यमंत्री दर्ज्याचे असते. कोरोना चे सावट थोडे निवळला नंतर हि जबाबदारी देण्याची दाट शक्यता आहे.

प्रो जोगेंद्र कवाडे एक मोठ्या समुदायाचे प्रतिनिधित्व करीत असल्यामुळे त्यांची नाराजी महाविकास आघाडीला महागात पडू शकते. त्यामुळेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस च्या एका वरिष्ठ नेत्यांनी पक्ष प्रमुख शरद पवार आणि काँग्रेस हाई कमांड सोनिया गांधी यांना हि बाब पटवून दिल्याचे समजतेय. शरद पवार, काँग्रेस कमांड सोनिया गांधी यांनी याबाबाद सकारात्मक असल्याचे बोलल्या जातेय.त्यांना काँग्रेस किंवा राष्ट्रवादी च्या कोट्यातून हे मंत्रिपद किंवा महामंडळ देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुकूल असल्याचे संकेत मिळत आहेत. रामदास आठवले भाजपाच्या गोटात असल्यामुळे काही प्रमाणात हा समुदाय भाजपकडे आहे. परंतु जुन्या, वरिष्ठ दलित नेत्यांपैकी प्रो जोगेंद्र कवाडे यांचाही एक चाहता वर्ग आहे. त्यांची नाराजी आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महागात पडू शकते त्यामुळेच आगामी मंत्रीमंडळ विस्तारात त्यांना राज्यमंत्री पद किंवा किंवा वजनदार महामंडळ वर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group