आनंदाची बातमी;रोजगाराच्या परिस्थितीत होतेय सुधारणा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/choice-vector-id533921758.jpg)
सध्या कोरोनामुळे गदा आली असेन तर. ती सर्वांच्या नौकरीवर. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे तर, काही ठिकाणी पगार कपात करण्यात आली आहे. बातम्यांमुळे गेल्या काही महिन्यांपासून अनेकांची काळजी वाढत असताना आता एक आनंदाची बातमी आली आहे. देशातील रोजगारा संदर्भातील परिस्थितीत वेगाने सुधारणा होत आहे.
गेल्या चार महिन्यांपासून करोना लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था, बेरोजगारीबाबत काळजी व्यक्त करणारे अहवाल येत होते. गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणात कामगार कपात झाली. पण आता एक आनंदाची बातमी समोर येत आहे. लॉकडाउनपासून मुक्तता झाल्यानंतर त्याचा परिणाम दिसू लागला आहे. येत्या तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेच त्याचा आणखी चांगला परिणाम दिसू शकेल असे जाणकारांचे म्हणणे आहे. यामागे सर्वात महत्त्वाचे कारण आहे रोजगारासंदर्भातील परिस्थिती झालेली सुधारणा होय.
इंडियन जॉब मार्केटमध्ये जुनच्या तुलनेत जुलै महिन्यात मोठी तेजी दिसत आहे. जुलै महिन्यात १.५ लाख अॅक्टिव्ह जॉब ओपनिंग झालेत. जून महिन्यात ही संख्या फक्त १.३ लाख इतकी होती. याचा अर्थ रोजगाराबाबत २० हजार इतकी वाढ झाली. देशातील रोजगाराचे प्रमाण १५ टक्क्यांनी वाढले आहे.
ज्या क्षेत्रात सर्वाधिक रोजगार मिळत आहे त्यात सॉफ्टवेअर, इंटरनेट इनबेल्ड सर्व्हिस, बँकिंग, फायनान्स सर्व्हिस आणि विमा, आयटी, शिक्षणातील तंत्रज्ञान, इ कॉमर्स, आरोग्य सेवा यांचा समावेश होतो. या शिवाय रिटेल, एफएमसीजी, एनर्जी, फार्मा या क्षेत्रात देखील तेजी दिसत आहे.