रोटरी क्लब ऑफ पुणे सहवासचा पदग्रहण सोहळा ‘झूम मीटिंग’द्वारे साजरा

अध्यक्षपदी रो. किरण इंगळे, तर सचिवपदी रो. प्रकाश अवचट यांनी पदभार स्वीकारला
पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी
कोविड १९ मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून वर्ष २०२०-२१ साठीचा रोटरी क्लब ऑफ पुणे सहवासचा पदग्रहण सोहळा नुकताच ‘झूम मीटिंग’द्वारे पार पाडण्यात आला. सदर कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून रो. किरण इंगळे सचिवपदी रो. प्रकाश अवचट यांनी पदभार स्वीकारला.
तसेच यावेळी वर्ष २०२०-२१ साठी संचालकमंडळदेखील निश्चित करण्यात आले. हा पदग्रहण समारंभ रो. डीजीई रश्मी कुलकर्णी यांच्या विशेष उपस्थितीत पार पडला. यावेळी नूतन अध्यक्षांनी रोटरी क्लबच्या यावर्षीच्या कार्यक्रमाची स्पष्ट केली.
रोटरी ओपन अपॉर्च्युनिटी ही रोटरी थीम आणि डिस्ट्रिक्ट ३१३१ ची ट्रेलब्लेझर्स ही थीम असे नाविन्यपूर्ण यावर्षी राबवले जाणार असल्याचे सांगून ते म्हणाले, सध्या आपण कठीण परिस्थितीतून जात आहोत आणि कोविड -१९ नंतरचे न्यू नॉर्मल म्हणून ओळखले जाणारे जग हे आधीपेक्षा खूप वेगळे असणार आहे. या आव्हानाचा आपण संधी म्हणून उपयोग केला पाहिजे. त्यादृष्टीने यावर्षीची थीम मला अतिशय समर्पक वाटते. त्यांनी यावेळी ‘टफ टाईम नेवर लास्ट बट टफ पीपल डू’ या म्हणीची आठवण करून दिली.
रो. संचालक कमल संघवी यांच्या ‘संकटे आपल्या जगण्यात रोमांच आणतात आणि रोटरीयन्स संकटांना हसत सामोरे जातात’ या वक्तव्याची आठवणही करून दिली. या कठीण परिस्थितीमध्ये डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. रश्मी कुलकर्णी यांच्या नेतृत्त्वाखाली आपण रोटरीचा झेंडा उंच फडकत ठेवू असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, रश्मी कुलकर्णी यांचे ह्या वर्षीचे ‘वॉटरशेड’ हे ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ योजनेचे ड्रीम प्रोजेक्टआहे. तसेच तसेच २0000 मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि महिला सबलीकरणासाठी अनेक योजना राबवण्याचादेखील त्यांचा मानस आहे. या योजनांमध्ये रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास देखील मेजर क्लब म्हणून काम करणार आहे. मुख्य म्हणजे सिनर्जी मध्ये ग्लोबल ग्रॅन्ट करण्याची संधी देखील मिळणार आहे. सर्व सभासदांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने वेगवेगळ्या स्तरावर चांगले प्रोजेक्ट करण्यासाठी सदैव तत्पर आणि प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर या योजनेअंतर्गत महिला सबलीकरणासाठी गॅलेक्सी मोटर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये ११ महिलांना ड्रायव्हिंग शिकवून त्यांना त्या व्यवसायामध्ये मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अखेरीस त्यांनी सर्वांकडून सर्व प्रकारे सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आणि कार्यक्रमांचे नियोजन विशद केले.
यावेळी रो. पीडीजी मोहनभाई, रो. परमार, पीडीजी दीपक पुरोहित, एजी रो. विलास गवांदे,रो. मंजू फडके, रो. सुदिन आपटे, रो. गोविंदराव हर्डीकर, शेखर टाकळकर, रत्नाकर बागुल, रो. गिरीश, रो. मंगेश हांडे, सहवास सदस्य, सहकारी रोटरीयन्स उपस्थित होते.





