breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: अकोल्यात ६५ टक्के रुग्णांची कोरोनावर मात
![Anxiety increased! 11 students of private medical college in Nagpur tested positive](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/corona-patient-1-1-1.jpg)
अकोला जिल्ह्यात आतापर्यंत ७४२ रुग्णांची करोनावर मात केली आहे. त्याचे प्रमाण ६५.३१ टक्के आहे. करोनातून बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. त्यात आज दुपारनंतर रुग्णालयातून सोडण्यात आलेल्या १८ जणांचा समावेश आहे. त्यातील ११ जणांना घरी पाठवण्यात आले तर उर्वरित सात जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.