भारतीय लष्करातील अधिकारी सुमन गावनी यांना संयुक्त राष्ट्र संघाचा ‘मिलिट्री जेंडर अॅडव्होकेट’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पहिल्यांदा भारतीय सैन्यदुताला या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. सुमन या संयुक्त राष्ट्र संघाची एक मोहीम अंतर्गत दक्षिण सुदानमध्ये तैनात होत्या. नुकतीच त्यांनी आपली ही मोहीम पूर्ण केली आहे.
सुमन गावनी यांच्यासोबत ब्राझिलच्या लष्कराच्या कमांडर कर्ला मॉन्टेइरो डे कास्त्रो अराउजो यांनादेखील ‘मिलिट्री जेंडर अॅडव्होकेट’ या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे प्रमुख अँतोनियो गुतारेस यांनी सुमन गावनी आणि कर्ला मॉन्टेइरो डे कास्त्रो अराउजो यांच्या नावाची निवड केली. तसंच त्या सर्वांसाठी एक आदर्श ठरतील असंही ते म्हणाले. दरम्यानं भारतानंही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मेजर सुमन गावनी यांना २९ मे रोजी पार पडणाऱ्या ऑनलाइन समारंभात या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रातील भारतीय नेतृत्वाकडून देण्यात आली.
https://twitter.com/IndiaUNNewYork/status/1264968005500522496
२९ मे रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय शांती रक्षक दिनानिमित्त आयोजित एका ऑनलाइन कार्यक्रमात सुमन गावनी यांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्या सुदानमध्ये एका मोहिमेवर होत्या. सुमन गावनी आणि कर्ला मॉन्टेइरो डे कास्त्रो अराउजो या सर्वांसाठी एक आदर्श आहेत. त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून नव्या विचारांची बिजं रुजवली आणि समाजात आत्मविशासाची भावनाही वाढवली असल्याचं मत अँतोनियो गुतारेस यांनी व्यक्त केलं.




