Breaking-news

#CoronaVirus:येवल्यात बलात्कारातील संशयित आरोपीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

नाशिक : येवल्यात बलात्कारातील संशयित आरोपीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. राज्याचे अन्न नागरिक, पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळांचा मतदारसंघ असलेला येवला कोरोनामुक्त झाल्याचं चित्र असतानाच येवल्यात आणखी एक कोरोना रुग्ण सापडला आहे. बलात्काराच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या संशयित आरोपीच्या संपर्कात आलेल्या 3 पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

या तरुणाने 20 फेब्रुवारी रोजी एका महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा येवला शहर पोलीस ठाण्यात 14 मे रोजी दाखल करण्यात आला. त्यानंतर या संशयित आरोपीला ताब्यात घेत कोर्टात हजर केले असता त्याला नाशिक जिल्हा मध्यवर्ती ग्राहक कारागृहात पाठवण्यात आले होते.कोरोना विषाणूमुळे स्वॅब घेण्यासाठी त्याला येवला येथील विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले होते. आज संध्याकाळी आलेल्या कोरोना तपासणी अहवालात या 24 वर्षीय संशियत तरुण आरोपीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या संशयित आरोपीच्या संपर्कातील 3 पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button