#CoronaVirus: कोरोनाचे मूळ शोधण्याच्या प्रस्तावास भारताचा पाठिंबा
कोविड १९ विषाणूला देण्यात आलेला जागतिक प्रतिसाद व विषाणूचे प्राणिज मूळ स्रोत शोधून काढण्याची गरज याबाबतचा प्रस्ताव जागतिक आरोग्य संघटनेचा संस्थात्मक घटक असलेल्या आरोग्य सभेच्या सोमवारपासून सुरूहोत असलेल्या परिषदेत मांडला जाण्याची शक्यता आहे. त्याला भारतासह साठ देशांनी पाठिंबा दिला आहे.पाठिंबा देणाऱ्या देशात अमेरिकेचा समावेश नसल्याची प्राथमिक माहिती आहे.
जागतिक आरोग्य सभेची ३२ वी वार्षिक परिषद सोमवारी सुरू होत असताना अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना विषाणूचे चीनच्या वुहानमधील मूळ शोधून काढण्यासाठी चौकशी करण्याच्या मागणीच्या अनुषंगाने काही मुद्दय़ांचा विचार करण्याचा आग्रह धरण्यात आला. युरोपीय समुदायाने कोविड १९ साथीबाबत ठराव सादर केला असून त्यात असे म्हटले होते की, जागतिक आरोग्य सभेने करोना विषाणूला दिलेल्या जागतिक प्रतिसादाचे निष्पक्ष व स्वतंत्र, सर्वंकष मूल्यमापन करावे.