Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: सरकारला जाग कधी येणार? KEM रुग्णालयाचा व्हिडीओ पोस्ट करत राम कदम यांचा प्रश्न

केईएम रुग्णालयात रुग्णांना खाली बसण्याची वेळ आली आहे. अनेक रुग्ण जमिनीवर बसले आहेत. त्यांच्या वैद्यकीय सेवेचं काय? काहीच नाही का? अत्यंत दुःखद बाब.. महाराष्ट्र सरकारला कधी जाग येणार? असे प्रश्न विचारत भाजपाचे नेते राम कदम यांनी केईएम रुग्णालयातला व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ आज सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांचा असल्याचंही राम कदम यांनी म्हटलं आहे. तसंच रुग्णांच्या अवस्थेवरुन त्यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.





