होम क्वारंटीनसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नव्या मार्गदर्शक सूचना

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्वानुसार. ज्या रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत, असे रुग्ण लक्षणे दिसल्यापासून १७ दिवसांनंतर आपले होम क्वारंटीन संपवू शकतात.मात्र, या १७ दिवसांच्या काळात अशा रुग्णाला सलग १० दिवस ताप आलेला नसावा.
कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्यानंतर आपापल्या घरातच क्वारंटीन ठेवण्यात आलेल्या लोकांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नव्या मार्गदर्शक सूचना (गाइडलाइन्स) जारी केल्या आहेत. यात असे रुग्ण होम क्वारंटीनमधून केव्हा बाहेर येऊ शकतात हे स्पष्ट करण्यात आले आहे.
करोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सौम्य लक्षणे आढळलेल्यानंतर करोनाची लागण झालेले, किंवा ज्यांच्यात करोनाची पूर्व लक्षणे आढळली आहेत, अशा रुग्णांना घरी राहण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, असा रुग्णाला योग्य त्या सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे.





