Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
#CoronaVirus: पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे १३ नवे रुग्ण; सहा महिन्यांच्या बाळाचाही समावेश

पिंपरी-चिंचवड शहरात आज सर्वाधिक १३ करोना बाधित रुग्ण आढळले असून यात ६ महिन्याच्या चिमुकलीचा समावेश आहे. यातील दोन जण शहराच्या हद्दीबाहेरील असून त्यांच्यावरदेखील महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील करोना बधितांची एकूण संख्या १६७ वर पोहचली आहे. आतापर्यंत ७७ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर ७ जणांचा मृत्यू झालेला आहे.





