कल्याण-डोंबिवली प्रवेशबंदीच्या निर्णयाला स्थगिती; एकनाथ शिंदेंचे केडीएमसीला आदेश
कल्याण | कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून मुंबईत काम करणाऱ्यांना कल्याण-डोंबिवली शहरांत येण्यास प्रवेशबंदी करण्यात आली होती. मात्र आता या प्रवेशबंदीच्या निर्णयाला स्थगित देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी केडीएमसीला हे आदेश दिले आहेत. कल्याण-डोंबिवली शहरांत राहणाऱ्यांना सीमाबंदी करुन त्यांनी मुंबईत व्यवस्था करण्याची विनंती महापालिकेला करण्यात आली होती. कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे कुटुंबियांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता या निर्णयाला तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे.
सध्या कल्याण-डोंबिवलीतून मुंबईत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी मागवण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवलीतून मुंबईत कामासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांची सोय करण्यास काही अवधी लागू शकत असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.