breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: चंद्रपूरमध्ये टाळेबंदी ‘जैसे थे’; कोरोनाबाधितांच्या संपर्कातील लोकांची यादी तयार
चंद्रपुरात सापडलेल्या एकमेव करोनाबाधित रुग्णाची प्रकृती उत्तम असून त्याच्या संपर्कातील ४६ जणांची यादी तयार करण्यात आली आहे. तर १० संशयित रुग्णांचे स्वॅब प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, करोनाग्रस्त सापडलेल्या क्षेत्रात १४ दिवस सर्वांना येणे-जाणे बंद करण्यात आलं आहे. रूग्णावर उपचार करणाऱ्या आरोग्या कर्मचाऱ्यांना देखील होम क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात टाळेबंदी कायम असून जीवनावश्यक वस्तू वगळता नव्या दुकानांना परवानगी नसल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.