breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus | दिल्लीमधील ११ जिल्हे ‘१७ मे’पर्यंत रेड झोनमध्ये राहणार !
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/CoronaVirus-4.jpeg)
नवी दिल्ली | कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशात लॉकडाऊन हा १७ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. दरम्यान, केंद्र शासनाने देशातील जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन अशा तीन झोनमध्ये विभागणी केली आहे. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी असे सांगितले आहे, दिल्लीतील ११ जिल्हे हे १७ मेपर्यंत रेड झोनमध्ये असणार आहेत. टाळेबंदीचे सर्व नियम या भागात लागू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.