#CoronaVirus: राज्यातील पत्रकारांना विमा संरक्षण द्या:- बापूराव सोलनकर
महाईन्यूज । दौंड । प्रतिनिधी
महाराष्ट्रातील आरोग्य कर्मचारी व शिक्षकांना देण्यात आलेल्या कोरोना विमा संरक्षणा प्रमानेच शासनाने राज्यातील सर्व पत्रकारांना विमा संरक्षण कवच देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दौंड तालुका पक्षनिरीक्षक बापूराव सोलनकर यांनी मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांचे कडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन च्या काळात पत्रकारांचेही खूप मोठे योगदान राहिलेले आहे, कोरोना मूळे निर्माण झालेल्या अडचणीच्या काळात कोरोना संदर्भातील माहिती स्वतःचा जीव मुठीत घेऊन ते लोकांपर्यंत पोहचवत असतात. पत्रकारांनाही स्वतःचे कुटुंब असते, त्यांच्याही जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्याही सुरक्षेची काळजी आपण घेतली पाहिजे कोरोना संधर्भातील अपडेट्स व माहिती राज्यातील कानाकोपऱ्यात पोहचवण्यार्या मुंबई शहरातील अनेक पत्रकारांना कोरोनाची लागण झाली आहे. जसे आपण पोलिस, डॉक्टर्स, यांना विमा सुरक्षा कवच जाहीर केले त्याच प्रमाणे पत्रकारांनाही त्यामध्ये समाविष्ट करावे. अशी मागणी बापूराव सोलनकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.