प्रिमियम कंपनी कामगारांच्या आंदोलनाकडे निगरगठ्ठ व्यवस्थापनाचे दुर्लक्ष
पिंपरी – आकुर्डीतील प्रिमियम एम्पाॅईज युनियनच्या वतीने कामगारांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा आज (बुधवार) 50 वा दिवस आहे. आैद्योगिक न्यायालयाने दिलेल्या आदेशाची कंपनी व्यवस्थापन पायमल्ली करीत असून कामगारांच्या धोरणावर व्यवस्थापन चिडीचूप भूमिका घेतली आहे. त्यामुळे कंपनीतील कामगारांनी मागील 50 दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.
प्रिमियम कंपनीने कामगारांचे सहा महिन्याचे थकीत वेतन अद्याप दिलेले नाही. वेतनातून कपात केलेली एलआयसीचे रक्कम दिलेली नाही. कामगारांच्या वेतनातून कपात केलेला प्राव्हेट फंड अद्याप पीएफ, ईएसआय भरलेला नाही. यासह विविध मागण्यांकरिता प्रमियम लिमिटेड कंपनीच्या कामगारांचे ५० दिवसापासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक व कामगार संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. यामध्ये स्वराज इंडिया पार्टीचे मानव कांबळे, विश्वकल्याण कामगार संघटनेचे दिलीप पवार, श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष आशिष शिदे, माजी नगरसेवक मारुती भापकर आदी उपस्थित होते.